Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड वर्षभरात जिल्ह्यात १७५ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

वर्षभरात जिल्ह्यात १७५ शेतकर्‍यांच्या आत्महत्या


मराठवाड्यातील ७७३ शेतकर्‍यांनी मरणाला कवटाळले
मराठवाड्यात रोज दोन शेतकरी करतात आत्महत्या
बीड (रिपोर्टर)- मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर आत्महत्या थांबेल असे वाटत होते मात्र त्यानंतरही आत्महत्या थांबल्या नसल्याचे दिसून येऊ लागले. गेल्या वर्षभरामध्ये मराठवाड्यातील ७७३ शेतकर्‍यांनी कर्जबाजारी, नापिकी आणि सावकारी जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातच १७५ झाल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याचा गवगवा केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने केला जातो. कर्जमाफी असेल किंवा नुकसान भरपाईल असेल यामुळे आत्महत्या थांबल्या नसल्याचे आजपर्यंत दिसून आले. भाजप आणि महाआघाडी सरकारच्या कार्यकाळात कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला मात्र त्यानंतरही राज्यात शेकडो शेतकर्‍यांनी मरणाला कवटाळले. निसर्ग शेतकर्‍यांना साथ देत नाही, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी दुष्काळाच्या चक्रव्युहात शेतकरी अडकत चाललाय. त्यातच शेतीमालाला नसलेला हमीभाव, खासगी सावकाराचा फास, नापिकी यासह इतर कारणांमुळे शतेकरी आत्महत्या करत आहे. पुर्वी विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त असायची, त्याचे लोण मराठवाड्यात आले. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये होऊ लागल्या. दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. या वर्षभरामध्ये मराठवाड्यातील ७७३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यातील सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून जिल्ह्यातील १७५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी आहे. दरम्यान आत्महत्येची आकडेवारी पाहता मराठवाड्यामध्ये दररोज दोन शेतकरी मरणाला कवटाळत असल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची संख्या
बीड १७५
उस्मानाबाद १२७
औरंगाबाद १२२
जालना ८८
नांदेड ७७
लातूर ६७
परभणी ६४
हिंगोली ५२
पात्र – अपात्रांची संख्या
जिल्हा पात्र
बीड १५१
उस्मानाबाद २५
औरंगाबाद ९१
जालना ७४
नांदेड ६५
लातूर ६२
परभणी ३४
हिंगोली ३९

अपात्र

१५
९४
२६
०९
०८
०३
२१
१०

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...