बीड (रिपोर्टर): रोहयो योजनेमध्ये गैरप्रकार होत असल्याने केेंद्र सरकार सातत्याने त्यात बदल करत आहे. सार्वजनिक कामासाठी मजुराच्या चेहर्याचे आधारीत प्रमाणिकरण करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला. त्यानंतर आता वैयक्तिक कामासाठी हा निर्णय घेतला गेला. त्याची अंमलबजावणी 30 मार्चपासून होणार आहे. जे खरे मजूर आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय चांगला असून जे कागदावर मजूर दाखवतात त्यांच्यासाठी मात्र ही बाब अवघड झाली आहे.
गावपातळीवर रस्ते, शेततलाव, सिंचनविहिर, घरकुल यासह इतर कामे रोहयोअतंर्गत केली जातात. गुत्तेदार बोगस मजूर दाखवून शासनाची दिशाभूल करत आलेला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी कामावरील मजुरांचे चेहरा आधारीत प्रमाणिकरणाची सक्ती करण्यात आली. यामुळे गैरप्रकाराला काही प्रमाणात आळा बसला. हा निर्णय आता वैयक्तिक कामासाठी सुद्धा लागू करण्यात आला. 30 मार्चपासून वैयक्तिक कामासाठी असलेल्या मजुरांचे फेस अथेंटीकेशन करण्यात येणार आहे. यामुळे आता वैयक्तिक कामातील गैरप्रकारर देखील कमी होणार आहेत.








