बीड (रिपोर्टर)ः- मोमीनपूरा भागातील एका महिलेने अनेकांना वेगवेगळ्या पध्दतीची आमीषे दाखवून लुटलेले आहे. या प्रकरणी तिच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झालेले आहे. सदरील महिलेस हद्दपार करावे यासाठी अनेक महिलंाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
शेख नाजीया रा.मोमीनपूरा या महिलेने आतापर्यंत अनेकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम केलेेले आहे. सदरील महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये अनेक स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. तरीही या महिलेस अटक केली जात नाही. त्या महिलेच्या विरोधात हद्दपारीची कारवाई करावी या मागणीसाठी शेख सालेहा शेख रईसोनिसा, शहाना शेख, जरीना पठाण, शेख साबीया, शेख तनवीर, शेख मुमताज, शेख अंजुम यांच्या सह अन्य महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण सुरू आहे.










