आत्महत्या; मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीडमध्ये
बीड (रिपोर्टर) कर्जबाजारी, नापिकी यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यात जिल्हाभरात 170 शेतकर्यांनी आपले जीवन संपवले. मराठवाड्यात सिंचनाचे क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळे येथील शेतकर्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाचा लहरीपणा आणि शेती पिकाला नसलेला भाव यामुळे शेतकरी विळख्यात सापडू लागला. शेतकर्यांच्या आत्महत्येचा आकडा पाहता शेतीचं स्मशान होत असल्याचे दिसून येऊ लागलं आहे.
गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू झालेला आहे. पुर्वी विदर्भामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होत होत्या मात्र विदर्भातील आत्महत्या कमी झाल्य आणि मराठवाड्यातील आत्महत्येचा आकडा वाढू लागला. आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तुटपुंज्या योजना राबवल्या जातात. यामुळे शेतकर्यांचं आर्थिक संवर्धन आजपर्यंत झालेलं नाही. मराठवाड्यात सिंचनाचं क्षेत्र 20 टक्क्यांच्या आत आहे. यामुळे येथील शेतकर्यांना निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांसाठी मारक ठरू लागला. त्यातच बीड जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक विळख्यात सापडत असल्याने सर्वात जास्त आत्महत्या बीडमध्ये होत आहेत. गेल्या आठ महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यातील 170 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. शेतकर्याच्या आत्महत्येचा आकडा पाहता शेतीचं स्मशान होत असल्याचं चित्र दिसून येत आहे.