Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडपरळी‘साजिशे काम नही आती दुवॉओं के खिलाफ’ म्हणत दीपक देशमुख निघाले पायी...

‘साजिशे काम नही आती दुवॉओं के खिलाफ’ म्हणत दीपक देशमुख निघाले पायी तुळजापुरला

आई भवानी, धनंजय मुंडेंवरचं संकट दूर कर
परळी (रिपोर्टर)-तुळजापुर येथील आई तुळजा भवानीला परळी येथील माजी नगराध्यक्ष तथा नगर सेवक दिपक देशमुखांनी त्याच्या पत्नी ना.धनंजय मुंडे वरील हे आलेले संकट लवकर दुर कर असे साकडे घालुन परळी ते तुळजापुर पायी दिंडी करत दर्शनाला येईल असा नवस केला आहे. आज परळी शहारातुन वाजत गाजत मिरवणुक काढुन तुळजापुर ला रवाना झाले आहेत


राज्याचे सामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडे यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील उतंग काम अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे.अश्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे षडयंञ होत आहे.हजारो वंचित मुला मुलींची लग्न लावुन देणारा भाऊ म्हणजे आमचे साहेब आहेत.बीड जिल्ह्यातील लाखों जनतेचा आशीर्वाद साहेबासोबत आहे.या नेतृत्वाला राजकीय सामाजिक क्षेत्रात बदनाम करता येत नाही म्हणुन अश्या गलिच्छ बाबी पुढे करुन संपविण्याचे काम केले जात असुन हे नेतृत्व या दबावाला कधी ही बळी पडणार नाही पुर्ण विश्वास जनतेला आहे.म्हणुन तुळजापुर येथे जाऊन आई जगदंबे तुळजा भवानी साकडे घातले आहे कि आई आमच्या नेतृत्वावर आलेले हे संकट दुर कर हे संकट दुर झाले कि परळी ते तुळजापुर पायी दिंडी काढुन तुझ्या दर्शना येईल असे साकडे ही माजी नगराध्यक्ष दिपक देशमुखांनी आई तुळजा भवानीला घातले आहे. ना.धनंजय मुंडे यांनी कोरोना लॉकडाऊन कालावधीत परळी विधानसभा मतदारसंघात अन्नधान्य वितरणासोबत मेडिकल हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्णांनाही मदत केली होती. हक्काचा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असून याचा उल्लेखही आज सर्वत्र आवर्जुन केला जात असल्याचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!