बीड (रिपोर्टर) शेतकर्याने मोठ्या कष्टाने आपल्या शेततळ्यात मासे सोहले होते. ते मासे विक्रीसाठी आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून 500 किलो मासे चोरून नेल्याची घटना परळी तालुक्यातील टोकवाडी येथे घडली. या प्रकररी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकिशोर रामपालजी लोहिया या शेतकर्याने आपल्या टोकवाडी शिवारातील शेतात शेततळे बांधलेले आहे. त्या शेततळ्यात त्यांनी मासे सोडले होते. अज्ञात चोरट्याने काल पहाटे तळ्यातील 500 किलो मासे काढून नेले. या प्रकरणी लोहिया यांनी परळी ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.