किल्ले धारूर( रिपोर्टर ) धारूरच्या घाटामध्ये आज सकाळी सव्वानऊ वाजता एसटी बस व स्विफ्ट डिझायर कार यांचा अपघात झाला आहे या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार मधील दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत आज सकाळी धारूर बसस्थानकातून 9 वाजता निघालेली धारूर- बीड गाडी घाटामध्ये आली असता समोरून वडवणी हून येत असलेली स्विफ्ट डिझायर कार एका दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस क्रमांक एम् एच 20 बी एल 2930 व स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 44 एस 9105 कारचा समोरासमोर अपघात झाला यामध्ये स्विफ्ट डिझायर कार मध्ये एकूण चार व्यक्ती होते त्यापैकी दोन व्यक्ती गंभीर आहेत प्रल्हाद गव्हाणे व रोहिदास शिंदे हे गंभीर जखमी आहेत त्यापैकी प्रल्हाद गव्हाणे यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय पाठवण्यात आले आहे तर रोहिदास शिंदे यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत धारूरच्या घाटामध्ये दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे अरुंद घाट असल्याने दररोज अपघात होत आहेत जीवितहानी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे ही अपघाताची मालिका थांबवण्यासाठी घाटाची रुंदीकरण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून धारूरशहरातील नागरिक करत आहेत