पाटोदा (रिपोर्टर)पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी (गारमाथा) येथील असणारे रहिवासी अंकुश किसन राजपुरे यांच्या राहत्या घरावर दि.19/9/2022 रोजी घरावर वीज पडली असून यामध्ये विज पडून संसार उपयोगी सामान,कपडे व धान्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील महेँद्रवाडी (गारमाथा) येथे दि.19 रोजी अंकुश किसन राजपुरे यांच्या राहते घरावर दुपारी तीनच्या दरम्यान वीज पडली असून यामध्ये घरात असणारे ज्वारी, बाजरी,कपडे,भांडे,पिठाची चक्की, सायकल सह आदी संसार उपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झाले असून तरी या नुकसान भरपाई पंचनामा करून संबंधितांनी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पाटोदा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये अंकुश किसन राजपुरे व गणेश किसन राजपुरे यांनी केली आहे.