बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. सुरेश साबळे हे विशेष लक्ष देऊन असतात. दररोज सकाळी राऊंड घेत रुग्णांची विचारपूस करत असतात. आज सकाळी त्यांनी एका महिलेवर स्वत: पट्टी करत कामात हयगय करणार्या डॉक्टर व कर्मचार्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते.
डॉ. सुरेश साबळे आल्यापासून त्यांनी जिल्हा रुग्णालयात अनेक बदल केले. वेळेवर न येणार्या डॉक्टरासह कर्मचार्यांना ते धारेवर धरत असतात. काही वेळा त्यांनी कामचुकार कर्मचार्यांचा पगारसुद्धा कपात केेलेला आहे. आज त्यांनी एका वयोवृद्ध महिलेच्या जखमेवर पट्टी नाही केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वत: त्या वृद्धेच्या पायावर पट्टी करत या महिलेवर उपचार करण्यास निष्काळजीपणा करणार्या डॉक्टर व कर्मचार्यांना त्यांनी झापझाप झापले आहे.