नवी दिल्ली (वृत्तसेवा) काँग्रेस अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिला उमेदवारी अर्ज शशी थरूर यांनी भरला. गांधी घराण्याची पसंत मल्लिकार्जुन खरगेही उमेदवारी दाखल करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. पण, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयात राजस्थानच्या वादाचे पडसाद उमटत आहेत. येथे सचिन पायलटचे समर्थक जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
अध्यक्षपदासाठी खरगे यांचे नाव समोर आल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ते खरगे यांना भेटायलाही आले होते. या भेटीनंतर ते माध्यमांसमोर बोलत होते. घरी पत्रकार परिषदेत बोलताना दिग्विजय म्हणाले, मी कॅमेरासमोर बोलेन, पळून जाणारा नेता नाही. काँग्रेससाठी काम केले आहे. काम करत राहीन. तीन गोष्टींमध्ये तडजोड करत नाही. मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. दुपारपर्यंत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल, असे त्यांचे पुत्र जयवर्धन यांनी सांगितले.