बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, वडवणी, केज या सहा तालुक्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसून अन्य पाच तालुक्यात केवळ कोरोनाचे अठरा रुग्ण आढळून आल्याने कोरोना हळूहळू हद्दपार होत असल्याचे समाधानकारक चित्र स्पष्ट होताना दिसून येत आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३०८ कोरोना संशयितांची तपासणी केली असता यामध्ये २९० जण निगेटिव्ह आले तर १८ जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ६, बीड ४, धारूर ४, परळी १ तर शिरूर तालुक्यातील ३ रुग्णांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, वडवणी, केज या सहा तालुक्यात आज एकही रुग्ण आढळून आला नाही ही समाधानाची बाब आहे.