बीड (रिपोर्टर) मन्यारवाडी येथील प्रभावती श्रीकिसन माने यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 60 वर्षे होते. काल रात्री साडे आठ वाजता मन्यारवाडी येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीड तालुक्यातील मन्यारवाडी येथील प्रभावती श्रीकिसन माने या आपल्या कुुटंबियासह उत्तराखंडमध्ये देवदर्शनासाठी गेल्या होत्या. हरिद्वार येथे त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना देवभूमी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवस तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलवण्यात आले मात्र उपचारा दरम्यान काल त्यांचा मृत्यू झाल. त्यांच्या पश्चात पती, पाच मुले, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय छावा संघटना प्रदेशाध्यक्ष दिव्यांग आघाडीचे सुरेश माने यांच्या त्या चुलती होत. माने कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.