किल्ले धारूर ( रिपोर्टर) धारूर अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे . धारूर तालुक्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यामुळे धारूर तालुक्यातील शेतकर्यांचे सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ मदत देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे व सर्व पिकांची नासधूस झाल्यामुळे शेतकर्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे सोयाबीन पीक हे सध्या काढणीस आलेले असताना शेतकर्यांच्या तोंडचा घास निघून गेलेला आहे व धारूर तालुका हा पिक विम्यातून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे धारूर तालुक्याचा पिक विमा मध्ये समाविष्ट करून शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा तसेच तालुक्यातील शेतकर्यांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच धारूर तालुक्याचा पिक विमा मध्ये समावेश करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने दिनांक 21 ऑक्टोबर पासून तहसील कार्यालय धारूर समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष प्रशांत विठ्ठलराव शिनगारे यांनी आज तहसील कार्यालयाला लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे आले आहे यावेळी उपस्थित शेतकरी शेतकरी वैजनाथ दिनकर देशमुख, राहुल बोराडे, दादा फरताडे, तसेच नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी धनंजय शिरसाट तालुका उपाध्यक्ष, सचिन रघुनाथ कांदे, सचिन घोडके, अतिश शुक्ला, अरुण तिडके इत्यादी उपस्थित होते










