Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमलाज वाटली पाहिजे तुम्हाला, पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या चित्रा वाघ संतापल्या

लाज वाटली पाहिजे तुम्हाला, पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या चित्रा वाघ संतापल्या

मुंबई (रिपोर्टर)-पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन भाजपा प्रचंड आक्रमक झाली असून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसर्‍या घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली.
यानंतर चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत टीका केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.
पोलीस रक्षक आहेत की भक्षक आहेत अशी विचारणा करताना चित्रा वाघ यांनी नक्कीच यांच्यावर दबाव आहे असा आरोप केला. पोलीस आमच्याकडे तक्रार नाही असं सांगत आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे. ते राजकीय दबाबाखाली काम करत आहेत. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिलेलं नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!