बीड (रिपोर्टर) ‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत रहावे, घेता-घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’ या विं.दा. करंदीकरांच्या कवितेतील ओळी गोरगरिब समाजाविषयी पितृत्व आणि दातृत्वाच्या भूमिकेत असलेला राजयोग फाऊंडेशन यांच्याबाबत तंतोतंत लागू पडतात. गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळी असो वा रमजान अथवा अन्य कुठलेही सणवार, या निमित्त गोरगरिब कष्टकरी कामगार मजुरांचे सण गोड व्हावेत म्हणून दिलीप धूत आणि त्णयांचे पुत्र शुभम धूत हे तत्परतेने पुढे येतात. देणार्याचे पहिले हात म्हणून ते गोरगरिबांचे सणसुद आनंदात द्विगुणीत करतात. यावर्षीही तब्बल अडीच हजार गोरगरिबांना फराळाचं वाटप यांच्यामार्फत होत आहे.
सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणार्या बीडच्या राजयोग फाऊंडेशनने गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम सातत्याने केले आहे. दिलीप धूत आणि त्यांचे पुत्र शुभम धूत हे प्रत्येक सणवाराला मग ती दिवाळी असो वा ईद असो अथवा अन्य कुठले सण असोत हे सणवार गोरगरिबांचे आनंदात जावेत, उत्साहात जावेत म्हणून सातत्याने ते मदतीचा हात घेऊन पुढे आलेले आहेत. कोरोनासारख्या महाभयानक महामारीत लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेकांच्या घरी अन्नधान्य पोहचवून घर चालवण्याची जबाबदारीच धूत आणि राजयोग फाऊंडेशन यांनी घेतली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळी आणि रमजान सणात हजारो गोरगरिबांना फराळ आणि किराणा किटचे वाटप केले जाते. या वर्षीही दिलीप धूत आणि शुभम धूत यांच्या राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने तब्बल अडीच हजार गोरगरिब कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांची दिवाळी गोड केली. हजारो लोकांना अत्यंत उत्कृष्ट गोडधोड फराळाचे किट वाटप करण्यात आले. देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत रहावे, घेता घेता घेणार्यांनी देणार्यांचे हात घ्यावे, ही विं.दा.ंची कविता या ठिकाणी आठवते. राजयोग फाऊंडेशनने सुरू केलेल्या या सत्कर्माची अन्य संस्थांनी उजळणी सुरू करून त्यांनीही असे उपक्रम सुरू केले हे राजयोग फाऊंडेशन आणि दिलीप धूत यांच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल.










