बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण, जि.प. कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड पार पडल्यानंतर शनिवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. यामध्ये सुनील घोडके यांची सलग दुसर्यांदा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नारायण शिंदे आणि सचिवपदी सुभाष राऊत यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
1995 ला स्थापन झालेल्या या कर्मचारी पतसंस्थेच्या माध्यमातून 2015 पासून सुनील घोडके यांनी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेत पतसंस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. पुर्वी कर्ज मर्यादा केवळ 5 लाख होती ती आता 15 लाखांवर गेली आहे. तातडी कर्ज 25 हजार रुपये होते ते आता 80 हजारापर्यंत मंजूर करण्यात येते. सुनील घोडके यांच्या निवडीनंतर त्यांना प्रत्यक्ष व सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.