आष्टी (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात नव्हे अशी तालिम सतिश आबा शिंदे नी आष्टी शहरात उभा केली एका छताखाली मॅटवरील कुस्ती,लालमातीतील आखाडा,जिम अद्यावत सुविधायुक्त तालिम मधील मल्ल येणारी तरुणी पिढी निरवेसणी घडेल आबा युवक घडवण्यासाठी तन मनाने झटतायत त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.त्यांना पैलवान असल्याने कुस्त्यांची आवड आहे.मी खात्री व विश्वास देतो की जय हनुमान तालीम एक दिवस महाराष्ट्रात नाव गाजवल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 15 लाख रुपये जाहीर करतो जय हनुमान तालीम ची जबाबदारी आबा तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या आम्ही काही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी पै.सतिश शिंदे यांच्या संकल्पनेतुन उभारलेल्या जय हनुमान तालीम उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर आ. बाळासाहेब आजबे, मा.आ. साहेबराव दरेकर, मा.आ. भिमरावजी धोंडे,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, डिवाय. एस.पी. राहुल आवारे, डॉ.शिवाजी राऊत,किशोर हंबर्डे, सभापती पाथर्डी गहिनीनाथ शिरसाट, आण्णासाहेब चौधरी, परमेश्वर शेळके, महादेव डोके, दिगंबर पोकळे, सरपंच संतोष चव्हाण, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गर्जे, कल्याण महाराज कोल्हे, नवनाथ महाराज पोकळे, दिपक घुमरे, शिवभुषण जाधव,विठ्ठल सानप,शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब घुले, पप्पु गुंड, पांडु शेळके, रोहिदास महाराज शास्त्री, सुनिल नाथ, गोवर्धन सानप, शिवा शेकडे,महादेव कोंडे, जालिंदर गायकवाड, हरि सांगळे,संदीप जगदाळे,महादेव आंधळे, अमोल दरेकर आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. मुंडे म्हणाले की जे होते ते चांगल्यासाठीच होते राजकीय आखाड्यात तुम्ही पाडले म्हणून तुमची तालिम पडली म्हणून याठिकाणी भव्य दिव्य तालिम उभारली निरवेसनी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करताय मि मनापासून कौतुक करतो खात्री विश्वास देतो की महाराष्ट्रात जय हनुमान तालीम चे नाव होणार तुमच्या राजकीय जिवनात आमच्या सारख्या असंख्य हात पाठीशी आहेत.आ.बाळासाहेब आजबे यांनी शुभेच्छा दिल्या व म्हणाले की नागरीक गावागावात वस्तीवर सभामंडपाची मागणी करतात त्याऐवजी जर जिम वाचनालयाची मागणी केली तर तरुण पिढी घडेल येणार्या काळात गावागावात जिम व वाचनालय करण्याचा प्रयत्न आहे.यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण,महेबुब शेख,पै.सतिश शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.