मुंबई (रिपोर्टर) केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. पंधरा वर्षे जुनी असलेली सर्व सरकारी वाहनं स्क्रॅप होणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल, असं त्यांनी सांगितलं.
पर्यावरणपूरक आणि धाडसी निर्णयामुळे नितीन गडकरी यांची वेगळीच ओळख आहे. आता गडकरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगितलं.