बीड (रिपोर्टर) शहराती राजुरीवेस परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर बीड शहर पोलिसांनी रात्री कारवाई करून सात जुगार्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरीवेस जवळील भीमनगर येथे अजिंक्य वडमारे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळाली होती. काल रात्री साडेआठच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला. या वेळी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये अजिंक्य मधुकर वडमारे, भूषण युवराज वडमारे, विकास सुरेश जोगदंड, बाळु आश्रुबा सोनवणे, सुरज बापू वाघमारे, लखन प्रभू वडमारे, विकास सुरेश जोगदंड, निखिल बबन भालेराव यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 58 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख पीआय रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज परजने, पो.नि. गायकवाड, सिरसाट, डोके, सय्यद, पवार, सानप यांनी केली.










