बीड (रिपोर्टर) जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दारू विक्रीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दारू पिणार्यांची संख्याही वाढली. गेल्या दहा महिन्यात 10 लाख 63 हजार 882 लिटर दारू फस्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दारू विक्रीचा यकक्के वाढला आहे.
महसूल मिळावं म्हणून शासन दारू विक्रीला परवानगी देत आहे. बीड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अधिकृतपणे दारूची विक्री होत असली तरी अनाधिकृत दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री होऊ लागली. अवैध दारू विक्रीवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रर नसल्यामुळे दारू विक्रीचा महापूर वाहू लागला. गेल्या दहा महिन्यात 10 लाख 63 हजार 882 लिटर दारू विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दारू विक्रीचा टक्के वाढला. ज्या प्रमाणात दारू विक्री वाढली त्या प्रमाणात दारू पिणार्यांची संख्या सुद्धा वाढली आहे.










