दुपारी बारा वाजेपर्यंत हरीण रस्त्याच्या कडेला पडून
बीड (रिपोर्टर) अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणी फाटा येथे घडली. दुपारी बारा वाजेपर्यंत हरीण रस्त्याच्या कडेलाच पडून होते.
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका हरणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी हिंगणी फाट्याजवळ घडली. दुपारी बारा वाजले तरी हरीण रस्त्याच्या कडेलाच पडून होते. वनविभागाला यासंदर्भात नागरिकांनी माहिती देऊनही ते न आल्याने प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे.










