या ना त्या कारणामुळे आरटीओ ऑफिसचा भ्रष्टाचारी
कारभार समोर येत आहे -के.के. वडमारे
बीड (रिपोर्टर) बीड आरटीओ ऑफिस च्या बाबतीत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून वेगवेगळ्या चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहेत आरटीओ ऑफिस मध्ये गाडी नावावर करण्यासाठी गाडी पासिंग साठी टू व्हीलर फोर व्हीलर यासह अनेक परवानाधारक नूतनीकरण करण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या महत्त्वाच्या कामासाठी आरटीओ ऑफिस हा महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचे ऑफिस आहे परंतु गेल्या दोन-तीन महिन्यापासून त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचार्यांची मनमानी सुरू आहे सामान्य लोक आपल्या कामासाठी आपली गाडी नावावर करण्यासाठी खरेदी विक्री करणार्या लोकांसाठी वाहन विक्री करण्यासाठी विविध परवानगी आरटीओ ऑफिस ची लागत आहे मात्र त्या ठिकाणी कधी अधिकारी गैरहजर असतात तर कधी कर्मचारी गैरहजर असतात अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बेसिस्त कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नाहक त्रास होत आहे बीड जिल्हाधिकारी यांना विनंती आहे बीड आरटीओ ऑफिस ला लागलेल्या विघ्न हे आपण लवकरात लवकर दूर करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्राच्या वतीने आरटीओ ऑफिस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा केके वडमारी यांनी दिला आहे रखडलेल्या कामांसाठी सातत्याने वाहनधारक आरटीओ ऑफिसकडे येत जात आहेत लोड शेडिंगच्या नावाखाली कॉम्प्युटर चालत नाही कर्मचारी अधिकारी सुट्टीवर गेले आहेत अशा पद्धतीची माहिती आरटी कार्यालयातून दिली जाते मात्र ज्याचा राजकीय वशिला आहे राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र त्या ठिकाणी आरटीओ ला लागलेला विघ्न हे अभय देत आहेत त्यामुळे बीड आरटीओचा कारभार लवकरात लवकर सुधारण्यासाठी बीड जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अन्यथा बीड जिल्हा आरटीओ कार्यालयाच्या भ्रष्टाचाराचा पाढा बीड जिल्हाधिकारी समोर वाचला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव केके वडमारे यांनी दिला आहे.










