बीड (रिपोर्टर) घाटसावळी येथील एका खाणावळीत चार जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत तेथील कामगारांना मारहाण करून साहित्याची प्रचंड प्रमाणात तोडफोड केल्याने हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी संबंधितांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
बीड तालुक्यातील घाटसावळी येथील सचीन खाणावळीमध्ये काल चार जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून तेथील कामगारांना लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण करून साहित्याची तोडफोड केली. यात दोन कामगार जखमी झाले. या तोडफोडीमध्ये हॉटेलचे मालक सचीन लांडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.