बीड(रिपोर्टर)ःतालुक्यातील होळ येथे आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता इनोव्हा आणि ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात चौघे जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने (एमएच 16 सीएन 700) होळ येथे ऑपे रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाच्या चिंधड्या झाल्या तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या. या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी मुंडे (रा.पिसेगाव, ता.केज) याच्यासह चार जण जागीच ठार झाले. मृतात सहा महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी असलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांवर अंबाजोगाईच्या स्वारावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंजानक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. चालक वगळता इतर मृत आणि जखमी शिकलकरी समाजाचे असून एकाच कुटुंबातील आहेत.