बीड (रिपोर्टर) हजयात्रा 2022 साठी जाणार्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचीत करण्यात येते की, दि. 12-06-2022 रोजी जिल्हा रुग्णालय बीड, बाह्यरुग्ण विभाग येथे मेंदू आवरणदाह प्रतिबंधक लस टोचणीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.
संबंधित यात्रेकरूंनी दि. 12-6-2022 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहू सदरील लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी केले आहे.