दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर) तलावक्षेत्र भागामध्ये अतिक्रमण धारकाविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारधारकाला नायब तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये अतिक्रमणधारकाने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे पाटबंधारे उपविभागाने तलावासाठी जमीन संपादीत केली आहे. याठिकाणी मसुराम काकडे यांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. सदरील हा रस्ता वसंत काकडे याने बंद केला असून त्यामुळे येणार्या-जाणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणसंदर्भात तक्रार करण्यासाठी मसुरम काकडे हे वडवणीच्या नायब तहसीलदार यांच्याकडे गेले असता त्याठिकाणी येऊन वसंत काकडे याने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोषीविरोधात कारवाई करण्यात यावी व रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मिलिंद काकडे, मोहन काकडे, सुनिल काकडे, तात्या उबाळे, भगवान काकडे, दत्ता अंबुरे, नवनाथ गोंडे, रावसाहेब गोंडे, गोवर्धन गोंडे, गोरख गोंडे, बारीकराव गोंडे, दादाहरी उबाळे, रामकिसन गोंडे, बाबासाहेब तिडके, श्रीराम तिडके, कांता घोडे यांच्यासह आदींनी केली आहे. दरम्यान सदरील शेतकर्याने माजलगाव येथील पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केलेली आहे. यापुर्वीही अनेक वेळा निवेदन देण्यात आलेले आहेत.