वडवणी (रिपोर्टर):- कोठ्याच्या बाहेर बांधलेल्या तीन जनावराच्या अंगावर विज पडली असून यामध्ये तीन्ही जनवरे दगवली आहेत. हि घटना वडवणी तालुक्यातील उपळी शिवारात रात्री 8.30 वा. घडली आहे.
काल पुन्हा सायं पाच वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामध्ये उपळी शिवरातील तलाव लगत लेंडी नावाच्या शेता जवळ सुभाष राघू तुरमकर आणि महादेव श्रीपती थोरात या शेतकऱ्याची शेती आहे. सदरील शेती जवळ जवळ असल्या कारणाने जानावरांच्या निवारासाठी बांधलेले कोठे देखील जवळच आहेत. याच कोठ्याच्या बाहेर सुभाष तुरमकर यांनी म्हैस आणि तिचे वासरु व महादेव थोरात यांनी गाय बांधली होती. रात्री 8.30 वा. अचानक वादळी वारे आणि विजेचा कडकडाटसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बांधलेल्या जनावरांच्या अंगावरच अचानक विज पडली आणि यामध्ये तिन्ही जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. तर शेतकरी राजावर पुन्हा नैसर्गिक संकट ओढले असून लाखमोलाच जितराब दगावल्याने लाखो रुपायाचे नुकसान झाले आहे.










