वारंवार आंदोलन करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने घेतला आक्रमक पवित्रा
आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यातील पाटसरा ग्रामपंचायत मध्ये शिपाई रमेश दामु काळे 2021 पासून ग्रामसेवक नेटके यांना तुम्ही माझा अहवाल सादर करण्याच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती परंतु प्रस्ताव सादर केला नाही माझ्या जागेवर प्रस्ताव न करता निलेश गर्जे याची नेमणूक करुन ग्रामसेवकाने लाच घेऊन फसवणूक केली आहे.तक्रार असताना दुसरी शिपाईची नेमणूक कशी केली आज रोजीचा शिपाई गर्जे पद रद्द करण्यासाठी आष्टी पंचायत समिती च्या गेटवर ग्रामपंचायत शिपाई रमेश काळे व अशोक माने यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले असून पोलिस कडेकोट बंदोबस्त होता नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की ग्रामसेवकांनी दुसरा शिपाई नेमणूक कशी केली माझी तक्रार असताना गट विकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी या प्रस्तावावर कशा सह्या केल्या 25 जानेवारी 2023 रोजी लेखी आमिश दाखवून माझी फसवणूक केली तरी निलेश परमेश्वर गर्जे यांचे प्रोसिडिंगची नक्कल गावकर्यांच्या सह्या अजेंडा सादर केलेली नक्कल अॅप्रोल दाखल केलेली गटविकास अधिकारी यांची नक्कल मिळावी म्हणून 25 जानेवारी 2023 रोजी निवेदन समजून आपल्या 21 फेब्रुवारी 2023 रोजी निलेश गरजे याचे पद रद्द होत नाही तोपर्यंत माझी संपूर्ण थकीत रक्कम व माझा निकाल लागल्याशिवाय बेमुदत आमरण उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषण करते रमेश काळे यांनी घेतला आहे.शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे.
आज दि.22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता 2 दिवस आंदोलन करुन देखील दखल न घेतल्याने गटविकास अधिकारी होश मे आव, पंचायत समिती च करायचकाय खाली मुंडके वर पाय,गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलीस पोलीस विकास राठोड, पो.कॉ.विलास गुंडाळे,आकाश आडगळे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती बद्रीनाथ जगताप, गणेश शिंदे,यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत.