Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडकेज पोलीसांची नऊ हातभट्टी अड्ड्यांवर धाडी

केज पोलीसांची नऊ हातभट्टी अड्ड्यांवर धाडी


केज (रिपोर्टर):- शहरातील विविध भागात हातभट्टी अड्डे सुरू असून हे अड्डे रात्री केज पोलीसांनी उद्ध्वस्त केले. 9 ठिकाणी धाडी टाकून 94 हजार 500 रुपयांचे साहित्य नष्ट केले. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली.
शहरातील मेन रोड, भवानी माळ, क्रांतीनगर, या परिसरामध्ये हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार महादेव गुजर, बाळकृष्ण मुंडे, अशोक नामदास, चालक हनुमंत गायकवाड यांनी रात्री सदरील ठिकाणी धाडी टाकून 9 हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त केले. सदरील ठिकाणी रसायन व इतर साहित्य आढळून आले होते. या साहित्याची किंमत 94 हजार 500 रुपये इतकी होती. हे रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!