Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्याला 3 हजार 200 कोविडशील्डचे डोस प्राप्त

बीड जिल्ह्याला 3 हजार 200 कोविडशील्डचे डोस प्राप्त


बीड (रिपोर्टर):- अनेक दिवसांच्या खंडानंतर उद्यापासून 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविडशील्ड या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून बीड जिल्ह्याला लस नसल्यामुळे 45 वर्षांपुढील नागरिकांचे आणि 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीचा पहिला डोस थांबवण्यात आला होता. ज्या काही थोड्याफार लसी मिळत होत्या त्यातून 45 वर्षांपुढील लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत होता. मात्र आज बीड जिल्ह्याला कोविडशील्ड या लसीचे 3 हजार 200 डोस प्राप्त होत असल्यामुळे त्यातून काही प्रमाणात ज्यांना लसीचा पहिला डोस घेतला आहे अशा लोकांना दुसरा डोस देण्यासोबतच 45 वर्षीय पुढील नागरिकांना लसीचा पहिला डोसही देण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये कोव्हॅक्सिन आणि कोविडशील्ड या दोन्ही लस घेण्यासाठी नागरिकात जागरुता नव्हती मात्र दुसर्‍या लाटेमध्ये कोरोनाने मृत्यूसंख्या वाढू लागली. त्यामुळे लोकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली. लोकांच्या मागणीप्रमाणे लस उपलब्ध नसल्याने मध्यंतरीच्या काळामध्ये 45 वर्षांपुढील ज्या लोकांनी लस घेतली नाही, त्यांचा पहिला डोस आणि 18 ते 44 या वयोगटातील लोकांचा पहिला डोस थांबवण्यात आला होता. मात्र आज संध्याकाळपर्यंत बीड जिल्ह्याला 3 हजार 200 कोविडशील्ड लसीचे डोस प्राप्त होत आहेत. त्यामुळे उद्यापासून लसीकरण मोहिमेस पुन्हा सुरुवात होणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!