• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आष्टीत देवस्थान जमीन घोटाळा विधानसभेत गाजला; आष्टीतील देवस्थानाच्या जमीनी हडपणार्‍यांना सरकार किती दिवसात अटक करणार? जयंत पाटलांचा विधानसभेत सवाल

by Beed Reporter
March 8, 2023
Reading Time: 1 min read
0
आष्टीत देवस्थान जमीन घोटाळा विधानसभेत गाजला; आष्टीतील देवस्थानाच्या जमीनी हडपणार्‍यांना सरकार किती दिवसात अटक करणार? जयंत पाटलांचा विधानसभेत सवाल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तपास संथगतीने, तक्रारदारावरच खोटा गुन्हा, दोषींची नावे पटलावर मांडा, बीड जिल्ह्यात जमीन हडपणारे मोठे रॅकेट, तपासाला गती देणार -फडणवीस
मुंबई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर महादेव विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान यासह जिल्ह्यातल्या अन्य हिंदू देवस्थानाच्या जमीनी हडप करण्याचा प्रकार झालेला असताना या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावर गुन्हा दाखल झालेला असताना या प्रकरणाचा तपास जलदगतीने होत नाही उलट या प्रकरणातील फिर्यादीची नि:शुल्क सुरक्षा व्यवस्था काढून घेऊन त्याच्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात येतो, हे निंदनीय असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई होणार का? त्यांचे नाव पटलावर ठेवले जाणार का? असे सवाल गृहमंत्र्यांना विचारले. त्यावेळी या प्रकरणी तीन ते चार महिन्यात तपास प्रगतीपथावर नेण्याच्या सूचना दिल्या जातील आणि बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या जमीनी हडप करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. त्यामुळे या प्रकरणात अडकलेल्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यात बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीनीचे प्रकरण गाजले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. जयंत पाटील यांनी हे प्रकरण विधानसभेत उचलले. त्यांनी सरकारसह गृहमंत्र्यांना धारेवर धरत आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर, विठोबा, रामचंद्र यासह अन्य देवस्थानांच्या शेकडो एकर जमीन खासगी व्यक्तीच्या नावे झालेल्या आहेत. त्याविरुद्ध गुन्हा दाखल असला तरी पोलीस आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत नसल्याचा आरोप करत या प्रकरणातील फिर्यादीलाच त्रास दिला जात असल्याचे म्हटले. ज्या तक्रारदाराने धास दाखवून हे प्रकरण बाहेर काढले त्याविरुद्ध पेस्कोसारखा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा सरकार परत घेणार का? अन् या प्रकरणाचा तपास तात्काळ पुर्णत्वाकडे नेण्यासाठी निश्चित वेळ ठरविली जाणार का आणि या प्रकरणात अडकलेल्या आरोपींची नावे पटलावर ठेवले जाणार का? असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणीही अडकलेले असो त्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि हा तपास तीन ते चार महिन्यात पुर्णत्वाकडे न्यावा, अशा सूचना पोलिसांना दिल्या जातील, हे सांगतानाच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देवस्थानाच्या जमीनी हडप केल्या जात असल्याचे सांगत फडणवीसांनी बीड तालुक्यातील सहा, बीड शहरातील सहा, धारूर 2, गेवराई 1, अंबाजोगाई 3, आष्टी 12, माजलगाव 1 आणि केज 1 या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले. बीड जिल्ह्यातला जमीन घोटाळा विधानसभेत गाजल्यामुळे या घोटाळ्यात हात ओले करणार्‍या अधिकार्‍यांसह दोषींचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या प्रकरणात जयंत पाटलांसह दिलीप वळसे पाटील आणि आ. प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तरामध्ये सहभाग नोंदवला. आ. सोळंकेंनी तर जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्ड यांच्या जमीनी हडपल्या प्रकरणाचे तब्बल 94 प्रकरणे असल्याचे आणि तशा आशयाचे अफिडेविट दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयात दिल्याचे आ. सोळंकेंनी सांगितले. या सर्व प्रकरणात तपास जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात येतील, असे फडणवीसांनी म्हटले.

हे प्रकरणे टाईम बाँडमध्ये काढा-दिलीप वळसे पाटील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासामध्ये सरकारला हस्तक्षेप करता येत नसतो, असे म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी तपास जलदगतीने व्हावा त्यासाठी निश्चित वेल सरकारने ठरवावी, असे म्हटले असता फडणवीस यांनी तीन ते चार महिन्यांमध्ये या प्रकरणाचा तपास पुर्णत्वाकडे नेण्याबाबत संबंधित यंत्रणेला सुचना केल्या जातील असे म्हटले.

कुमावतांचा तपास काढला, वाळकेंना दिला

जयंत पाटलांचा फडणवीसांना चिमटा
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती जलदगतीने काम करतात हे या आधी या प्रकरणात दिसून आले आहे. केजवरून आष्टीला जाण्यासाीं तपासी अधिकारी कुमावत यांचा वेळ जातो म्हणून त्यांच्याकडील तपास काढून तो डीवायएसपी वाळके यांच्याकडे देण्यात आला. यात फडणवीस हे या प्रकरणी किती गंभीर आहेत हे दिसून येते. कारण आज मागणी होते आणि दुसर्‍याच दिवशी कुमावतांकडील तपास काढला जातो, असा चिमटा, या वेळी जयंत पाटलांनी घेतला.

Previous Post

बोरखेडमध्ये तरूण शेतकर्‍याची गळफास घेवुन आत्महत्या

Next Post

संतापजनक; सौंदाण्यात अघोरी कृत्य; महिलेला विवस्त्र केले, हातपाय बांधले, मासिक पाळीचे रक्त काढले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
संतापजनक; सौंदाण्यात अघोरी कृत्य; महिलेला विवस्त्र केले, हातपाय बांधले, मासिक पाळीचे रक्त काढले

संतापजनक; सौंदाण्यात अघोरी कृत्य; महिलेला विवस्त्र केले, हातपाय बांधले, मासिक पाळीचे रक्त काढले

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?