धारुर पोलीस दारु विक्रेत्यावर कारवाई का करत नाही?
बीड (रिपोर्टर)ः- केज तालुक्यातील कासारी येथे अनाधिकृत दारुची विक्री होत आहे. गावात दारु मिळत असल्याने गावाची शांतता भंग होवू लागली. दररोज वादावादी होवू लागली. दारु विक्रीवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली. स्थानीक पोलीस दारु विक्रेत्यावर का कारवाई करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कासारीमध्ये अवैधरित्या दारु विक्री जात असल्याने दारुपायी अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहे. गावातील शांतता भंग होवू लागली. दररोज वादावादी होत असल्याने त्याचा त्रास नागरीकांसह महिलांना सहन करावा लागतो. दारु बंदीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलीसंाना पाठवण्यात आले होते. मात्र अनेक दिवसापासून दारु विक्री जात असतांना स्थानीक पोलीस मात्र गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दारुच्या विरोधात गावातील महिला आक्रमक झाल्या आहे. दारु बंद करावी अशी मागणी गावातील नागरीकातून केली जावू लागली आहे.