Saturday, October 16, 2021
No menu items!
HomeUncategorizedशॉक लागून जरुड येथील दाम्पत्याचा मृत्यू

शॉक लागून जरुड येथील दाम्पत्याचा मृत्यू


मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या काकडेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर):- शेतात चोरून लाईट वापरण्यासाठी टाकलेल्या आकड्याच्या वायराला चिकटून तरुण दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील जरुड येथे घडली. दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रामकिसन विश्‍वनाथ काकडे याच्याविरोधात कलम ३०४ प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरुड येथील रामकिसन विश्‍वनाथ काकडे याने चोरून लाईट घेतली होती. त्यासाठी त्याने खराब वायर वापरून आकडा टाकला होता. वायर पुर्ण खराब झाल्याने केवळ तार राहिली होती. काल पिंपळनेर परिसरात जोराचे वारे सुटल्याने वायर ढिले होऊन पुष्पा विष्णू काकडे यांच्या शेताजवळील ओढयातील रस्त्यावर पडले होते. त्याठिकाणाहून वैजिनाथ शामराव बरडे (वय ३०) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे (रा. वय ३० जरुड) हे त्या ठिकाणाहून जात असताना शोभा यांचा पाय वायरावर पडल्यामुळे त्यांना शॉक लागून त्या खाली कोसळल्या. त्यावेळी वैजिनाथ यांना पत्नी खाली का पडली ? हे न समजल्यामुळे त्यांनी पत्नीला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शॉक लागल्याने दोघांचाही यात मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणेप्रमुख भुतेकर, पीएसआय खरात, पीएसआय सानप यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नातेवाईकांनी चोरून आकडा टाकणारे रामकिसन विश्‍वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मयत वैजिनाथ बरडे यांचा मुलगा अक्षय बरडे याच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ३०४ प्रमाणे आरोपी रामकिसन विश्‍वनाथ काकडे याच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुपारी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. र्शाक लागून तरुण दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने जरुड परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!