तोंडावर काळ्या पट्ट्या; हातात लोकशाहीच्या हत्येचा बोर्ड; विरोधकांचे पायर्यांवर आंदोलन
आमच्याकडे पायतान आहे हे विसरू नका-बाळासाहेब थोरात
मुंबई (रिपोर्टर)ः- काँग्रेस नेते राहूल गांंधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात आज विरोधकांनी विधी मंडळाच्या पायर्यावर मुक आंदोलन केले. तोंडावर काळ्या पट्या लावत हातामध्ये लोकशाहीची हत्या असे बोर्ड घेत हे आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्ष नेते अजीत पवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून केंद्र सरकार लोकशाहीची दडपशाही करत आहे असे म्हटले तर दुसरीकडे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सरकारला खडेबोल सुनावत आमचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांची अवहेलना करणारी घोषणा, कृती चालली होती. ति अत्यंत निषेधार्ह आहे. त्या लोकांवर अध्यक्षांनी कडक कारवाई करायला हवी. उद्या त्याच्याकडेही राष्टीय नेते आहे. आणि आज आमच्याकडेही पायताण आहे हे विसरुन चालणार नाही. या सगळया गोष्टीचा विचार अध्यक्षांनी करावा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळया पट्टया बांधून मूक आंदोलन केलं. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले होते. आता आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकारचा निषेध अशा पद्धतीने नोंदवला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर 24 तासांच्या आता लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना तातडीने जामीन मंजूर करण्यात आला आणि शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली तरीही ही कारवाई झाली. ही लोकशाहीची दडपशाही आहे असं मत सगळ्याच विरोधी पक्षांनी नोंदवलं. आज विधानसभेच्या बाहेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळ्या फिती लावून या निर्णयचा निषेध नोंदवला.