बीड (रिपोर्टर) शेतातील मशागतीसाठी दुसर्याचे ट्रॅक्टर का घेऊन आलास? तुला माझे ट्रॅक्टर नाही का? असे म्हणत एका शेतकर्याला आणि त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना 8 जून रोजी घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा गणपत लांब (वय 35 वर्षे) या महिलेने युसुफवडगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या बनकारंजा येथे राहत असून त्यांचे बनकारंजा शिवारात शेत आहे. त्या 8 जून रोजी आपल्या शेतात मोगडणी करत असताना तु दुसर्याचे ट्रॅक्टर मोगडणीसाठी का लावलेस? असे म्हणत उषा आणि तिच्या पतीला ज्ञानोबा कारभारी लांब, गणेश ज्ञानोबा लांब, बिभनंदा लांब, कृष्णा लांब (रा. बनकारंजा) यांनी मारहाण केल्याची घटना घडली.