धनगरवाडी परिसरात
घडली घटना
बीड (रिपोर्टर)ः- बांधकाम मिस्त्री असलेल्या 26 वर्षीय तरुणाचा आज सकाळी मृतदेह आढळून आला. हा तरुण कालपासून बेपत्ता होता. मयताच्या चेहर्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. ही घटना शहरापासून जवळ असलेल्या धनगरवाडी परिसरात घडली. सदरील मयत तरुणाच्या पॅन्टवर काहीतरी लिहिलेले असल्याचे दिसून आले.
शहाजी अशोक खेत्रे वय-26 वर्षे रा.उत्तम नगर धनगरवाडी हा तरुण बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होता. काल तो घराच्या बाहेर पडला होता. आज त्याचा उत्तम नगर येथील धनगरवाडी परिसरात एका झाडाखाली आढळून आला. गमजाने फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह खाली पडलेला होता. चेहर्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने हा घातापाताचा संशय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.