बीड (रिपोर्टर) बीड शहरातील प्रसिद्ध असलेल्या सिटी हॉटेलचे मालक हाजी अब्दुल गफुर कुरेशी यांचे काल दु:खद निधन झाले. आज संध्याकाळी नमाज ए मगरीब नंतर तकिया मस्जिद कब्रस्तान या ठिकाणी त्यांच्यावर दफनविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. बीड शहरामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून नावाजलेले सिटी हॉटेल आहे. अत्यंत चिकाटीने हॉटेल व्यवसायातून त्यांनी आपले नावलौकिकास आणले होते. या हॉटेलचे ते मालक होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वपरिचीत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कुरेशी कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.