बीड (रिपोर्टर) उपजिल्हा धिकारी मच्छिंद्र सुकटे यांची गेल्या काही दिवसांपूर्वी बदली झाली होती. त्यांच्या जागेवर दौंड येथून प्रमोद गायकवाड आले असून त्यांनी आपला पदभार घेतला आहे.
मच्छिंद्र सुकटे हे गेली अनेक महिने बीडच्या उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. त्यांची मध्यंतरी बदली झाल्याने त्यांचे पद रिक्त होते. त्यांच्या जागेवर पुणे दौंड येथील प्रमोद गायकवाड आले असून त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. त्यांच्याकडे लघू पायबंधारे विभाग देण्यात आले आहे. गायकवाड हे दौंडचे एसडीएम होते.