सर्वसामान्य नागरीकांची भ्रष्ट कर्मचार्यांकडून लूट
बीड (रिपोर्टर) तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक लूट करतात. पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाहीत. उत्पन्न आणि भूमीहिन प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरीकांना त्रास तर सहन करावाच लागतो वरून खिशाला आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. पैसे दिल्याशिवाय हे दोन्ही प्रमाणपत्र कार्यालयाकडून मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरीकात भ्रष्ट कर्मचार्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सेतू कार्यालयाच्या मार्फत विविध प्रमाणपत्रे काढली जातात. नियमानुसार ऑनलाईन फिस भरूनही वरून आगाऊ पैसे द्यावेच लागतात. उत्पन्न भूमीहिन यासह अन्य प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात दररोज अनेक नागरीकांची गर्दी असते. सर्वसामान्य नागरीकांना जाणीवपुर्वक अडवण्याचे काम भ्रष्ट कर्मचारी करू लागले आहे. सदरील कार्यालयातील कर्मचारी आपल्या नातेवाईकांच्या फोन पे वर पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत तहसीलदार यांनी दखल घेऊन सर्वसामान्यांना लूटणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी आणि नियमानुसार नागरीकांची कामे करावीत, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.









