बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे नेत्रतज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. याला डॉ. पल्लवी सापळे जबाबदार असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.
गेल्या काही दिवसांपूर्वी तात्याराव लहाने यांनी जे.जे. रुग्णालयाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. लहाने यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याचे काम डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी केले आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज काही समाज सेवकांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.