बीड (रिपोर्टर) आपल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला दिलेले आहेत. मात्र याची दखल शासनांकडून घेतली जात नसल्याने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचार्यांना एक रकमवी सेवा समाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेन्शन लागू करावी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, गणवेश भत्ता अदा केल्याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडीसेविकांनी आंदोलन केले. यावेळी बीड जिल्हा संघटक सचिन आंधळे, राज्य संघटक दत्ता देशमुख, बीड जिल्हा कमल बांगर, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.