• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा लाचखोरीचा धंदा; संतापजनक : कुटुंब शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतले पैसे

by Beed Reporter
June 15, 2023
Reading Time: 1 min read
0
शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा लाचखोरीचा धंदा; संतापजनक : कुटुंब शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतले पैसे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा लाचखोरीचा धंदा
संतापजनक : कुटुंब शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतले पैसे; केवळ पाचशे रुपयांसाठी महिलेला काढले
ऑपरेशन थिएटरबाहेर; ऑपरेशन केलेल्या महिलेला जमीनीवर झोपवले; पाण्याची व्यवस्था नाही
लाचखोर डॉक्टरासह दोषींवर कठोर कारवाईची मागणी
शिरूर कासार (सतीश मुरकुटे): कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. कुटुंब नियोजन करणार्‍या महिलांना प्रोत्साहनपर काही रकमेची मदतही करते, मात्र शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन करण्यासाठी आलेल्या महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना सर्रासपणे लुबाडल्याचे नव्हे नव्हे तर लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऑपरेशन केलेल्या महिलांकडून एक हजारपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत रक्कम डॉक्टरांनी घेतल्याचे रुग्णांनी सांगितले. एवढेच नव्हे तर एका महिलेकडे केवळ दोनशे रुपये नव्हते, म्हणून तिला ऑपरेशन थिएटरबाहेर काढल्याचा संतापजनक प्रकारही याच ठिकघाणी घडला असून ऑपरेशन केलेल्या सर्व महिलांना एका पोर्चमध्ये खाली जमीनीवर झोपवण्यात आले. एवढे मोठे शिबीर होत असताना साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था त्याठिकाणी दिसून आली नाही. येथील आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराचा पर्दाफाश सायं. दैनिक बीड रिपोर्टरने केला असून पैसे घेतलेल्या डॉक्टरांसह व्यवस्थापनात असफल असलेल्या सर्वच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
या संतापजनक आणि डॉक्टरांच्या लाचखोरीबाबतची अधिक माहिती अशी की, शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी 26 महिला आल्या होत्या. रात्री त्यांना उपाशी पोटी ठेवून आज त्यांच्यावर ऑपरेशन होणार होते. जेव्हा प्रत्यक्ष ऑपरेशनला सुरुवात करण्यात येऊ लागली तेव्हा कुटुंबनियोजन करण्यासाठी आलेल्या महिलांकडून एक हजार रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत घेण्यात आले. रिपोर्टरने रुग्णालयात जावून या घटनेची ऑन द स्पॉट व्हिडिओद्वारे माहिती घेतली तेव्हा एका सिझरसाठी हजार रुपयेप्रमाणे तर गर्भ राहिला असेल तर दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे घेण्यात आले. ज्या महिलांचे अगोदर सिझर झालेले असेल आणि ती महिला कुटुंबनियोजन करण्यासाठी आलेली असेल तर तिच्याकडून 2 हजार रुपये तर पिशवी साफ करण्यासाठी दीड हजार रुपये डॉक्टरांनी घतेल्याचे रुग्ण महिलेचे नातेवाईक अनिल बडे (रा. बडेवाडी) यांनी सांगितले. सविता सुमन आव्हाड यांच्याकडून हजार रुपये तर राधा मोहन ढाकणे यांच्याकडून अडीच अहजार, गीता रोमण (रा. आनंदवाडी) यांच्याकडून एक हजार रुपये, सुनिता बाबू जायभाये (रा. शिरूर पिंपळनेर) पिशवी साफ करण्यासाठी पंधरा हजार रुपये मागण्यात आले. तिच्याकडे केवळ एक हजार रुपये होते तेव्हा डॉक्टरांनी आणखी पाचशे असतील तरच ऑपरेशन केले जाईल, असे म्हणत तिला ऑपरेशन थिएटरबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या महिलेने अन्य महिलांकडून घेऊन पाचशे रुपये डॉक्टरांना दिले. एवढेच नाही तर ऑपरेशन केलेल्या महिलांना कॉटही देण्यात आलेले नव्हते. वार्डाच्या एका पोर्चमध्ये सतरंजी टाकून या महिलांना झोपवण्यात आले होते. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केेंद्रातला हा भोंगळ कारभार आणि लाचखोरीचा धंदा सायं. दैनिक बीड रिपोर्टरने आज उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा शल्यचिकित्सक आणी संबंधित अधिकार्‍यांनी घेऊन पैसे घेणार्‍या डॉक्टरांसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अस्वच्छता आणि
लाचखोरीचा दवाखाना
शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे अस्वच्छतेचे माहेरघर असल्याचे आज दिसून आले. इथले व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केलेले असताना साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली नव्हती. नातेवाईकांना तब्बल एक कि.मी.वरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. येथे रुग्णालयामध्ये जे डॉक्टर वाघमारे नामक वैद्यकीय अधिकार्‍याने शस्त्रक्रिया केल्या त्यांनी रुग्ण महिलांसह नातेवाईकांकडून पैशाची मागणी केली आणि पैसे घेतल्यानंतरच शस्त्रक्रिया केली
ही गंभीर आणि धक्कादायक बाब आहे.

Previous Post

आ.संदीप क्षीरसागरांचा शहरवासीयांना दिलासा!

Next Post

केजच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण तोडण्याच्या धास्तीने राज्य महामार्ग केला मोकळा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
केजच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण तोडण्याच्या धास्तीने राज्य महामार्ग केला मोकळा

केजच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण तोडण्याच्या धास्तीने राज्य महामार्ग केला मोकळा

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?