मुंबई (रिपोर्टर): रशियाचे हुकुमशहा व्हलादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे भाडोत्री सैन्य ठेवले होते. मात्र, आज तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट बाळगला आहे. हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत आत मंत्री शंभुराज देसाई यांचा मतदारसंघ असलेल्या पाटण दौर्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, पुतीन हा हुकुमशहा आहे. त्याने भाडोत्री सैन्य नेमले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. भाजपने हे सैन्य ठेवले आहे. हे असे भाडोत्री कुणाचेही नसतात. हे बाजार बुणगे आहेत. एक दिवस ते भाजपलाच खतम केल्याशिवाय राहणार नाही. नुकत्याच झालेल्या पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे. देशबचावसाठी नव्हे तर कुटुंब बचावसाठी हे नेते एकत्र आले, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, बैठकीसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसल्यानेही उद्धव ठाकरे कुणाशीही तडजोड करू शकता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलो. तर भाजप आणि शिंदे गट काय अध्यात्म, परमार्थासाठी एकत्र आला आहे.