नेकनुर(रिपोर्टर): गेल्या काही दिवसापूर्वी नेकनुर येथील कृषी व्यापार्याच्या घरी चोरी झाली होती. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत केला असल्याचे सांगण्यात येते.
श्रीराम जगताप यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरट्याने 15 तोळे सोन्याचे दागिने व नगदी 70 हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी नेकनुर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. सदरील चा चोरीप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव लखन भिमराव एरंडकर रा. वसमत असे आहे. त्याला मुंबई मधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील कारवाई ठाणेप्रमुख शेख मुस्तफा यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय विलास जाधव, बांगर, विशाल क्षीरसागर, तांदळे यांनी केली.