बीड (रिपोर्टर): भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकर्यांसह सर्वसामान्यांनी शर्यतस्थळी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. या शर्यतीचे उद्घाटन भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. शर्यतीसाठी बीडसह जिल्हाभरातून इच्छुक शेतकर्यांनी सहभाग नोंदवला होता.
गेल्या वर्षीपासून प्रथमच बीड जिल्ह्यात बैलगाड्यांची शर्यत सुरू करण्याचा मान भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना मिळत आहे. गेल्या वर्षीपासून ही शर्यत सुरू करण्यात आली असून या वर्षी शर्यतीमध्ये तब्बल 55 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तळेगाव शिवारामध्ये भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन झाले. या वेळी खा. प्रितम मुंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. एका वेळी सहा स्पर्धक या शर्यतीत भाग घेत होते. शर्यत पाहण्यासाठी बीड शहरासह पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने शेतकर्यांसह सर्वसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.