केज (रिपोर्टर): रेग्युलेटर बसवत असताना गॅसचा भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये घरातील संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना रात्री साळेगाव येथे घडली. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने साळेगाव येथे हलहळ व्यक्त केली जात आहे.
सय्यद शफी हे रात्री आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर बसवत होते. या वेळी गॅसचा भडका झाल्याने घरातील साहित्याने पेट घेतला. यात संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे साहित्य जळून खाक झाले. उद्या शफी यांच्या मुलाचे लग्न असल्यामुळे त्यांनी लग्नकार्यासाठी लागणारे साहित्य घरात आणून ठेवले होते. या दुर्दैवी घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.