• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या -उद्धव ठाकरे

by Beed Reporter
July 10, 2023
Reading Time: 1 min read
0
शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी आहिर, पाडवी यांच्या नावाची चर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर): पूर्वी सरकार मतपेटीतून यायचे. मात्र, हल्ली ते खोक्यातून येत आहे, असे खोचक भाष्य करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर असून आज ते खासदार नवनीत राणा यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीमध्ये आहे. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतर ते आता कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या लोकशाहीला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार माझ्यासाठी राजा आहे. मतदाराला मी गुलाम मानत नाही. आज आपला फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. पण, या मेळाव्यामधील गर्दी पाहून अनेकांना सलाईन लावण्याची वेळ आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यावर आरोप केला जातो की मी घरी बसून होतो. पण, मी घरी बसून कोणाची घरे फोडली नाहीत. तसेच, मला घरी बसून जे काम करता आले ते काम तुला घरे फोडूनही जमत नाहीये. सत्तेत नसूनही जनता माझ्यावर अफाट प्रेम करत आहे. मात्र, तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. मात्र, त्या शक्तीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या. तुम्ही राजकारणातील नामर्द आहात. फक्त अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी विचारत नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खांद्यावर बसवून पुढे आणले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप म्हणतो आमच्याकडे विश्वातील सर्वात लोकप्रिय, सर्वात शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. तरीही भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसर्‍यांची घरे फोडण्याची गरज का पडत आहे?
उद्धव ठाकरे म्हणाले, आतात चाय पे चर्चा नव्हे तर टपरीवर चर्चा व्हायला हवी. जिकडे जा तिकडे केवळ मोदींच्याच जाहीरातींचे फोटो दिसतात. मात्र, सर्वसामान्यांना या योजनांचा फायदा झालाच नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर वास्तव समोर आणणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे निष्ठावंत आता कुणाचे ओझे उचलत आहेत. ज्या भाजपच्या निष्ठावंतांनी प्रसंगी मार खाऊन पक्ष वाढवला, त्यांच्यावरच आता विरोधकांसाठी सतरंज्या उचलण्याचे काम करावे लागत आहे. छगन भुजबळांमुळे बाळासाहेब
ठाकरेंना तुरुंगात जावे लागले, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असे सांगत गद्दारांनी शिवसेना फोडली. मात्र, आता त्याच छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. आता काय सांगणार?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केला.


उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना मला सोडून जायचे आहे त्यांनी जावे. पण, शिवसेनेत मी मळ देऊ येणार नाही. कोरोना असताना इतर राज्यात मृतदेह नदीत वाहत होते. त्यांच्या मृतदेहांची विटंबना होत होती. हे मी महाराष्ट्रात होऊ दिले नाही. हेच भाजपच्या पोटात दुखत आहे. यांना इतर विकासात्मक भरीव कामे करता येत नाही म्हणून आता समान नागरी कायदा समोर आणला जात आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील राम मंदिराचा मुद्दा तापवला जाईल.


राईट टू रिकॉल आणावे का?

उद्धव ठाकरे म्हणाले, उद्या कुणीही दमदाटी करून व पैशाचा वापर करून देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. नागरिकांना हे फोडाफोडीचे राजकारण चालणार आहे का? अशाने देशाचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळे मतदान करताना जसा नाटोचा अधिकार मतदारांना आहे, तसेच आता निवडणुकीनंतर राईट टू रिकॉलचा अधिकार द्यावा का, यावर चर्चा करायला हवी.
लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार
उद्धव ठाकरे म्हणाले, लोक मोठ्या विश्वासाने एखाद्या नेत्यावर, पक्षावर विश्वास ठेवून आपले लोकप्रतिनिधी निवडतात. नंततर तेच लोकप्रतिनिधी पैशांसाठी, खोक्यांसाठी दुसरीकडे गेले तर काय करायचे? अशावेळी जनतेनेच लोकप्रतिनिधीला निवडून दिले असेल तर त्याला परत बोलावण्याचा अधिकारही जनतेला द्यावा का?, यावर चर्चा करायला हवी.
शिवसेना नाव देणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्षच चोरला जात आहे. हे एक नवे राजकारण भाजपने सुरू केले आहे. त्यासाठी अगदी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे आणि ते नाव मी कुठेही जाऊ देणार नाही. कारण माझ्या वडिलांनी, आजोबांनीच हे नाव पक्षाला दिले आहे.

अन्यथा निवडणूक आयोगाचे नाव बदलू
उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षाचे नाव इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाही नाही. जे काही राजकीय पक्ष आहेत त्या निवडणुकीत काही गैरव्यवहार तर करत नाही ना? इतपत निवडणूक आयोगाचा अधिकार आम्ही समजू शकतो. पण, आमच्या पक्षाचे नाव इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. अन्यथा, आम्ही निवडणूक आयोगाचे नाव बदलू, ते आयोगाला मान्य असेल का?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, अशी गत सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची झाली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच, शरद पवारांनी शिवसेनेला भाजपपासून दूर नेले, या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी रुग्णालयात आजारी होतो, तेव्हा रात्री कपडे बदलून गुप्त गाठीभेटी कोण घेत होते?

Previous Post

गेवराई तहसीलवर निघाला संविधान अधिकार मोर्चा

Next Post

50 लाख द्या नसता धनंजय मुंडेंना जिवे मारीन

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
50 लाख द्या नसता धनंजय मुंडेंना जिवे मारीन

50 लाख द्या नसता धनंजय मुंडेंना जिवे मारीन

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?