जनआष्टी (रिपोर्टर): खुंटेफळ साठवण तलावाच्या भूसंपादनामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, तालुक्यात जनतेच्या हिताच्या योजना आहेत. त्यामध्ये बाधा आणता कामा नये, असे स्पष्टी प्रतिपादन आ. बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
ते आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या, अधिकार्यांच्या नावावर जमीनी घेऊन कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला आहे. नाव न घेता आम्हालाही तुमचे घोटाळे काढायला लावू नका, मूळ शेतकर्यांना पैसे न देता जमीनी घेऊन पैसे लाटायला लागले आहेत, असे सांगत खुंटेफळ साठवण तलावाच्या भूसंपादनामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केला आहे.