कासार समाजाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड (रिपोर्टर): नांदेड येथील ज्ञानेश्वर पवार याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीड येथील कासार समाज आक्रमक झाला असून या समाजाने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाच्या अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आपले जीवन संपवले. या प्रकरणी ज्ञानेश्वर पवार हा आरोपी जबाबदार असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी बीड येथील कासार समाज आक्रमक झाला असून समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.