स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश, धनंजय मुंडेंच्या कार्यप्रणालीने शेतकर्यांना धैर्य
परळी (रिपोर्टर): गोगलगाईने बाधीत केलेल्या क्षेत्राचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याचे सांगत बाधित क्षेत्राचे स्वतंत्र पंचनामे करून संबंधित शेतकर्यांना मदत पुरविण्या हेतू मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांना थेट बांधावरून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधत काही सूचना केल्या. उद्या दुपारपर्यंत मदत व पुनर्वसन खात्याकडून बीडसह उस्मानाबाद, लातूर व अन्य जिल्ह्यातील गोगलगाई बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश निघणार आहेत. त्याचबरोबर जे बियाणे उगले नाही बोगस आहे अशांच्या शेतकर्यांनी तत्काळ तक्रारी कराव्यात, त्याची दखल घेतली जाईल. उपाययोजना करण्याबाबत सरकार सतर्क असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज म्हटले. ते परळी तालुक्यातील गोगलगाईने बाधीत केलेल्या क्षेत्राची पाहणी करर्यासाठी वाघेबेट बेलंबा या गावात आले होते.
बीडसह लातूर, उस्मानाबाद व अन्य काही जिल्ह्यात गोगलगाई बाधीत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शेतकर्यांचे त्यातून प्रचंड नुकसान झाले आहे. आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील वाघबेट बेलंबा गावापासून बाधीत क्षेत्राच्या पाहणीला सुरुवात केली. सदरील क्षेत्रात गोगलगाईने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे दिसून आल्यानंतर या प्रकरणी मदत व पुनर्वसन खात्याशी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी बांधावरूनच संपर्क केला.
या खात्याचे सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क करत काही सूचना दिल्या. वस्तूनिष्ठ पंचनाम्याबरोबर या गोगलगाई प्रकरणात स्वतंत्र पंचनामे करण्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचा आदेश उद्यापर्यंत बीड उस्मानाबाद, लातूरसह बाधीत क्षेत्रातल्या जिल्ह्यात येईल. अनेक ठिकाणी बियाणे उगले नाही, काही ठिकाणी बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडे म्हणाले, त्याबाबत आपण एक व्हॉटस्अॅप नंबर दिला आहे, त्यावर बोगस बियाणे अथवा बियाणे उगले नसेल अशा शेतकर्यांनी तक्रारी कराव्यात, त्या तक्रारींची दखल घेतली जाईल. बीडसह मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आजपावेत पाऊस नाही. 25 जुलैपर्यंत चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. पाऊस झाला नाही तर त्याबाबत उपाययोजना आणि नियोजन सरकारने केले आहे, असेही मुंडे यांनी म्हटले. परळी परिसरातील वेगवेगळ्या शेतांमध्ये जावून धनंजय मुंडे पीक पाहणी करत आहेत. या वेळी त्यांच्या सोबत दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा कृषी अधिकारी जेजुरकर, एसडीएम नम्रता चाटे यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित आहेत.